परिचय
एमआयटी पूर्व प्राथमिक मराठी शाळेची स्थापना डॉ. विश्वनाथ डी. कराड यांनी १० जून, १९९१ रोजी केली. गेल्या २४ वर्षांपासून आमच्या शाळेत उत्कृष्ट दर्जाचे पूर्व प्राथमिक शिक्षण देण्यात येत आहे आणि पुढेही त्याच्या सातत्यासाठी आम्ही प्रयत्न करत राहू. या पूर्व-प्राथमिक शाळेच्या स्थापनेमागचा हेतू म्हणजे २.५ ते ५.५ वर्षे वयोगटातील मुलांसाठी चांगल्या प्रतीचे शिक्षण प्रदान करणे.
ही शाळा पुण्याच्या कोथरूड येथे मध्यवर्ती भागात स्थित असूनही शाळेची प्रशस्त इमारत, अनुकूल वातावरण आणि सुरक्षित भागात स्थित आहे. सुसज्ज इमारतीच्या भोवती खेळायचे मोठे मैदान आहे. स्वच्छ खेळती हवा त्याचबरोबर दोन बागा खेळण्यासाठी आहेत. प्रशस्त मोठे वर्ग, अनुकूल वातावरण आणि पुरेशी साहित्यसामग्री या सर्व सुविधा लहान मुलांना शिकण्यासाठी प्रेमळ आणि आनंददायी वातावरणात पुरविल्या जातात.
शाळेचा उद्देश म्हणजे मुलांचा सर्वांगीण व्यक्तिमत्वाचा विकास घडवणे. एक चांगल्या प्राथमिक शिक्षणाचा पाया मुलांच्या ज्ञानेंद्रिय, मानसिक तसेच भावनिकतेचा विकास करणे, त्या अनुभवाच्या आधारे शिक्षण आणि प्रकल्प पद्धती साध्य करता येतात. शाळा मुलांच्या प्रत्येक पैलूवर अगदी तपशीलपणे लक्ष केंद्रित करते. वर्षभरामधे मुलांच्या मानसिक आणि शारीरिक वाढीसाठी उत्तेजन देणे, विविध उपक्रम राबविणे ही कार्ये पार पडली जातात. उदाहरणार्थ, नेतृत्व गुणाला प्रोत्साहन देणे आणि बाल वयात शिस्त अंगीकारणे, मुलांमधून वर्गप्रतिनिधीची नेमणूक करणे. मुलांची जिज्ञासु वृत्ती जागृत करण्यासाठी सामान्य ज्ञान सारखी स्पर्धा आयोजित करणे. विविध कला उदा. संगीत आणि नृत्य यांचा परिचय करून देण्यासाठी संगीत दिवस आणि स्नेहसंमेलन यांसारखे कार्यक्रम घेण्यात येतात. आम्ही दैनंदिन जीवनातील गोष्टी मुलांना माहिती करुन देण्यासाठी रिलायन्स शॉपिंग मॉल्स यासारख्या ठिकाणी सहली आयोजित करतो जेणेकरून मुलांना मूलभूत वाणिज्य शिकण्यास मिळते. गणिताची आवड निर्माण करून त्यांना प्रोत्साहित करणे, त्यांची एकाग्रता वाढविणे, आकडेमोडीसाठी वापरण्यात येणारी चौकट पद्धतीचा अवलंब करणे, भाषेच्या कौशल्याला प्रोत्साहित करण्यासाठी त्यांना संस्कृत आणि संवादात्मक इंग्रजी शिकवायचे धडे दिले जातात.
शिक्षणाची एक महत्त्वपूर्ण बाजू म्हणजे मुलांचा भावनिक विकास करणे. आम्ही अनुकूल आणि सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देतो आणि ते आवश्यक असते. अनुभावातून भावना जसे आनंद, राग आणि दुःख यांसारख्या भावना मुलांमध्ये विकसित करून त्यांना सक्षम करणे. अशा प्रकारे प्रत्येक मुलामध्ये अतिशय लहान वयापासूनच आत्मविश्वास, स्वातंत्र्य आणि त्याचबरोबर स्वत:ची शिस्त विकसित करता येऊ शकते.
त्यामुळे एमआयटी पूर्व-प्राथमिक शाळेत परीपूर्ण शिक्षण देण्याचा आम्ही सर्वोत्तम प्रयत्न करतो. आमचे ध्येय आमच्या शाळेतील विदयार्थी हे आपल्या देशाचे जबाबदार व सुजाण नागरिक होणे हेच आहे. आमचा विश्वास आहे आम्ही त्यांच्या पंखामध्ये ते बळ देऊ की ते त्यांच्या आयुष्यात उंच भरारी घेतील आणि ते जे क्षेत्र निवडतील त्यामध्ये यश प्राप्त करून भविष्यातील जीवनात अनुकरण करतील.
कोथरूड कॅम्पस
- निवासी/अनिवासी शाळा: फक्त निवासी शाळा
प्रवेश प्रक्रिया
- शाळेत विशिष्ट इयत्तेत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची पात्रता (वय निकष )
- मिनी के.जी - ३ ते ४ वर्षे.
- ज्यु. के.जी. - ४ ते ५ वर्षे.
- सिनियर के.जी - ५ ते ६ वर्षे.
- आवश्यक दस्तऐवज : जन्माचा दाखला (मूळ प्रत) आणि जात प्रमाणपत्राची झेरॉक्स (लागू असल्यास)
- ऑनलाईन प्रक्रिया / मॅन्युअल प्रक्रिया : मॅन्युअल प्रक्रिया
- वार्षिक फी आणि पेमेंटचा प्रकार - १७,०००/- नगद.
- शुल्क परतावा : नियमानुसार.
ठळक वैशिष्ट्ये
Education Beyond Books
संपर्क
- एमआयटी पूर्व- प्राथमिक ( मराठी माध्यम शाळा) कोथरूड,पुणे
स. न. १२७-अ,
पौड रोड, कोथरूड
पुणे - ४११०३८ - +९१ ०२०-२५४४२१६६
- This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.