//
MAEER's MIT GROUP OF INSTITUTIONS, PUNE (INDIA)

शाळा

  • परिचय
  • प्रवेश प्रक्रिया
  • शुल्क संरचना
  • ठळक वैशिष्ट्ये
  • संपर्क
कै. दादाराव कराड विदयालय, अंबाजोगाई, (महाराष्ट्र) भारत

परिचय

कै. दादाराव कराड विदयालय, अंबाजोगाई विदयालयाची स्थापना जून २००३ रोजी झाली. या विदयालयामध्ये इयत्ता पहिली ते इयत्ता दहावी पर्यत मराठी माध्यम आणि सेमी इंग्रजी माध्यमाचे शिक्षण दिले जात असून महाराष्ट्र शासन मंडळाकडून मान्यता मिळालेली आहे.

ग्रामीण भागातील विदयार्थ्यांना शिक्षण देणे, समग्र शिक्षणाच्या माध्यमातून सर्वांगीण व्यक्तिमत्वाचा विकास घडवणे आणि आजच्या मुलांना भविष्यात भारताचे चांगले नागरीक घडविणे या उद्देशातून विदयालयाची स्थापना झाली. ही एक स्थानिक शाळा आहे. जवळच्या ठिकाणचे विदयार्थी या शाळेत दाखल होतात. ५०० हून अधिक विदयार्थी या शाळेत शिक्षण घेत आहेत.

नागझरी या परिसराचा डोंगराळ भाग २५ एकरात पसरलेला आहे. २५,००० स्क़े. फूट पेक्षा अधिक क्षेत्रावर बांधकाम झाले आहे. सर्वोत्तम पायाभूत सुविधा तसेच संगणकीय प्रयोगशाळा, व्यायामशाळा इ. विदयार्थ्यांना पुरविली जाते तसेच विदयार्थी येथे राहण्याचा आनंद देखील घेऊ शकतात. विदयार्थी शैक्षणिक अभ्यासक्रमाव्यतिरिक्त त्यांचे छंद सुध्दा जोपासू शकतात. मोकळ्या वेळेत संगीत साधनाची कला या परिसरात अवगत करता येऊ शकते. सकाळची सुरवात ही 'जागतिक शांतता प्रार्थना', 'प्राणायाम', 'योगा'ने सुरू होते. तसेच मनोरंजनासाठी घोडेस्वारी, बास्केटबॉलचे मैदान, खेळण्यासाठी मोठे मैदान इ. सुविधा पुरवल्या जातात. मूल्य शिक्षणाव्यतिरिक्त, त्यांच्यावर चांगले संस्कार घडवून ते भारताचे समंजस नागरिक आणि उदयाचे खंबीर नेतृत्व ठरतील हा विदयालयाचा प्रमुख उद्देश आहे.

प्राचार्याचे नाव :

principle details

श्री. बी. एन. पवार

  • ( कार्यालय ) +९१२४४६२४७६३४, +९१९७३००३५८७४
  • This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.
  • एमआयटी शाळा परिसर, नागझरी, परळी रोड, अंबाजोगाई, जि. बीड

अंबाजोगाई कॅम्पस

  • निवासी/अनिवासी शाळा: निवासी आणि अनिवासी शाळा या दोन्ही सेवा उपलब्ध

प्रवेश प्रक्रिया:

इयत्ता वय निकष आवश्यक दस्तऐवज ऑनलाईन प्रक्रिया / मॅन्युअल प्रक्रिया पेमेंटचा प्रकार शुल्क परतावा
पहिली ६ वर्ष जन्माचा दाखला मॅन्युअल प्रक्रिया डी.डी. स्टोअर ठेव
दुसरी ते चौथी ७ ते ९ वर्ष टी.सी. मॅन्युअल प्रक्रिया डी.डी. स्टोअर ठेव
पाचवी ते दहावी १० ते १५ वर्ष टी.सी. मॅन्युअल प्रक्रिया डी.डी. स्टोअर ठेव

फी संरचना :

वार्षिक फी संरचना वर्ष २०१५-१६

अ. क़्र. इयत्ता एकूण शुल्क ( निवासी सुविधेसह )
पहिली ते दुसरी रु. ७०,०००/-
तिसरी ते चौथी रु. ७५,०००/-
पाचवी ते सातवी रु. ८०,०००/-
आठवी ते दहावी रु. ८५,०००/-

ठळक वैशिष्ट्ये:

शारीरिक सुविधा:

    • प्रकाशित, हवेशीर, मोठे प्रशस्त वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत.
    • उत्कृष्ट ग्रंथालयाची सुविधा पुरविले जाते.
    • संगणकिय प्रयोगशाळा, संदर्भीत काम, व्यायामशाळा, वैयक्तिक सुसज्ज प्रयोगशाळा, गणिताच्या अभ्यासासाठी खोली, सामाजिक अभ्यासाची खोली, संसाधने (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि घर विज्ञान) इ. ग्रंथालयासाठी विशेष खोल्या उपलब्ध करून दिल्या जातात.
    • क्रिकेट, टेनिस, बास्केटबॉल आणि फुटबॉल, खो-खो, भडिमार चेंडू, कबड्डी इ. मैदानी खेळाची सुविधा पुरविले जाते.
    • व्यायामशाळा आणि अंतर्गत खेळाची खोली.
    • प्रथमोपचार कक्ष.
    • दृकश्राव्य खोली.
    • परिसंवाद आणि विचारविनिमय कक्ष.
    • सभागृह सुविधा.

अध्यापक:

    • पात्र आणि प्रशिक्षित शिक्षक त्यासोबत पुरेसे सुरक्षितता त्यामुळे समन्वय व अनुभवात्मक शिक्षण प्रदान केले जातात.
    • नाटक आणि भाषण उच्चार, सल्लागार म्हणून व्यावसायिक समुपदेशक आणि व्यवसायामध्ये सर्वागीण, संगणक प्रशिक्षक, रंगमंच आणि कला शिक्षक, (घरातील आणि मैदानी खेळ आणि मार्शल आर्ट्स प्रशिक्षण ). इ. साठी विशेष शिक्षक नेमले जातात.
    • सर्वोत्तम शिक्षक आकर्षित करण्यासाठी त्यांना उत्कृष्ट वेतन दिले जाते
    • शिक्षकांची देखील वैयक्तिक प्रगती करण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम आणि कार्यशाळा यातून विषयाची सामग्री आणि कौशल्य घडविण्यासाठी कार्यशाळा सुधारणा व तसेच त्यांच्या वैयक्तिक विकासासाठी संधी दिल्या जातात.
    • करिअर वाढ आणि नोकरी संपन्नता.
    • व्यवस्थापनात सहभागी होऊन त्यांच्या स्वाभिमान आणि स्वमुल्य विकसित करणे आणि संस्थात्मक जबाबदारी आणि मालकी गृहीत करणे.

विद्यार्थी :

  • शाळेच्या जागेपासुन सुमारे (५ किमी . पर्यंत) विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जातात.
  • वर्गातील विद्यार्थ्याची संख्या जास्तीत जास्त ५०. आणि विद्यार्थ्याची संख्या व शिक्षक यांचे गुणोत्तर २५: १ (कमाल) किंवा त्यापेक्षा कमी ठेवली जाते .
  • विद्यार्थ्यांना स्वत:चा अभ्यास करण्यासाठी जरुरीपेक्षा जास्त संधी दिल्या जातात; पालकांना आपल्या मुलांच्या शिक्षणात सहभागी आणि परस्पर भागीदार करता येईल अशी अपेक्षा करता येते. पालक समित्या, आणि इतर सक्रिय सहभागात पालकांना सहभागी होण्याची अपेक्षा ठेवता येऊ शकते.

अभ्यासक्रम :

  • शाळा विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शाळा माध्यमिक परीक्षांसाठी सर्वपरीने तयार करते.
  • पूर्व- प्राथमिक अभ्यासक्रमाची सुविधा.
  • दररोज मुलांना प्राथमिक इयत्तेपासून इयत्ता दहावी पर्यत अभ्यासाचे दडपण न येऊ देत तो कसा पूर्ण होईल याचा प्रयत्न केला जातो.
  • अभ्यासक्रम मुलांच्या सर्वागीण विकासासाठी प्रोत्साहन देणारा असा असून प्राथमिक, पूर्व प्राथमिक वर्गापासून विद्यार्थामध्ये समन्वय साधणारा असा आहे. माध्यमिक वर्गामध्ये प्रकल्प व संशोधन यावर अवलंबित अभ्यासक्रमावर भर दिला जातो. अभ्यासक्रम हा एका वर्गातून दुसऱ्या वर्गात वाढणारा असा असून तो नैसर्गिकरित्या वयाच्या विकासाप्रमाणे वाढविणारा आहे.

संपर्क:

  • कै. दादाराव कराड विदयालय, अंबाजोगाई, (महाराष्ट्र) भारत
    एमआयटी शाळा परिसर, नागझरी, परळी रोड, अंबाजोगाई, जि. बीड
  • +९१२४४६२४४३८५
  • This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.